Mukul Mandir School

N-7 CIDCO, Aurangabad, 431003
Mukul Mandir School Mukul Mandir School is one of the popular High School located in N-7 CIDCO ,Aurangabad listed under Education in Aurangabad , High School in Aurangabad ,

Contact Details & Working Hours

More about Mukul Mandir School

Satellite View:- http://www.wikimapia.org/#y=19893427&x=75360868&z=18&l=0&m=a&v=2
Visit: - http://www.mukulmandir.
.
.
.
.
तेवत राहणारा शिक्षक



निर्मलदादा

वर्तमानपत्रातील मोक्याच्या जागा जाहीरातींनी व्यापलेल्या असतात. या जाहिरातीत वेगवेगळया खाजगी कोचिंग क्लासेसच्या जाहीराती ठळक असतात. शाळा मात्र ओस पडतांना दिसतात हे एक कटु सत्य आहे.ज्यांच्या ओढीने वर्गात नाव नोंदवावे असे कोणी अधिकारी शिक्षक वाटयाला येतीलच याची शाश्वती राहिलेली नाही. शिक्षकाच्या नावाने एखाद दुसरीच शाळा आता ओळखली जाते. प्रत्येकाला केवळ संसारसौख्यापुरतेच शिक्षण आज हवे आहे. जीवनाची दृष्टी देणारे शिक्षक आज कमी होत आहे. आवडीने,आंतरीक ओढीने, सर्व पर्यायाचा त्याग करुन आजघडीला शिक्षक होणारे अपवादानेच दिसतात..

अशाही परिस्थितीत शिक्षणाचा आणि संस्काराचा ध्वज उचलून धरणारे काही हाडाचे शिक्षक आपल्याला सापडतात हे आजच्या पिढीचे संचित आहे. उदाहरणच दयायचे झाले तर औरंगाबाद शहरातील मुकुल मंदिर नावाची एक शाळा आहे. शहरी भागातील शाळा असूनही शाळेने निगर्ससान्निध्य जपले आहे. शाळेला भेट देणारा प्रत्येकजण शालेय वातावरणाने प्रभावित झाल्याशिवाय राहत नाही. गुरुदेव रविंद्रनाथाच्या शांतिनिकेतनची आठवण ही शाळा करुन देते.शाळेच्या जडणघडणीत मेालाचा वाटा असणारे निर्मलदादा ग्यानानी यांचा परिचय झाल्यावर घ्.... तेथे कर माझे जुळती ङ एवढीच भावना मनात उरते. निर्मलदादांचे जीवनकार्य विशेषत: शौक्षणिक कार्य,पक्षीप्रेम, निसर्गप्रेम, विदयार्थीप्रेम , सेवाभाव आदि पौलू एक उत्तुंग व्यक्तिमत्वाची साक्ष देतात. प्रसिध्दीपासून आणि बडेजावपासून प्रामाणिकपणे दूर राहून बालब्रम्हाचं खरंखुरं प्रेम मिळावं म्हणून सातत्याने धडपडणाज्या निर्मलदादांचा जीवनप्रवास एक नवलकथा आहे. भारत पाकिस्तान फाळणीच्या काळात थेट कराचीपासून ते औरंगाबादपर्यतचा निर्मलदादांचा प्रवास थक्क करणारा आहे.

Map of Mukul Mandir School