Yashwant Bank

Chawadi Chowk, Karad, 415110
Yashwant Bank Yashwant Bank is one of the popular Financial Service located in Chawadi Chowk ,Karad listed under Bank/financial institution in Karad , Bank in Karad ,

Contact Details & Working Hours

More about Yashwant Bank

सहकाराचे बाळकडू घरातूनच मिळाल्यामुळे सहकार क्षेत्रात काम करण्याची आवड सुरुवातीपासूनच होती. त्यामुळे पिग्मी एजंट ते एका सहकारी बँकेचा अध्यक्ष हा प्रवास खरोखरच नेत्रदिपक म्हणावा लागेल. 2002 साली यशवंत बँकेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी हाती आल्यावर सर्व प्रथम थकबाकीचा डोंगर दूर करुन तसेच संचित तोटा भरून काढणे हे एकमेव लक्ष्य ठेवून कामकाज केले. तत्कालीन संचालक मंडळातील सदस्य, अध्यक्ष, सल्लागार मंडळ तसेच सेवक यांच्या सहकार्यामुळे दिलेली उद्दिष्ट्ये पूर्ण करता आली. त्यामुळे आजारी अवस्थेत असलेली बँक आज अतिशय सक्षमपणे कामकाज करत आहे. सर्व सभासद, ठेवीदार, हितचिंतकांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाल्याचे चरेगांवकर यांनी सांगितले.
बँकेचा व्यवसाय 12 कोटीवरुन 175 कोटींपर्यंत पोहोचला आहे. केवळ 5 वर्षात ही प्रगती साध्य करणे खरोखरच अविश्वसनीय बाब आहे. मात्र सर्वांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
यशवंत उद्योग समूहामध्ये बँक, पतसंस्था, पर्यटन सेवा, सहकार प्रशिक्षण, दुग्ध संकलन व वितरण, तसेच निसर्गोपचार व गृहनिर्माण संस्था या सर्वांचा समोवश असून यानिमित्ताने प्रत्येक बाबीचा सविस्तर उल्लेख श्री. चरेगांवकर यांनी झी 24 तासशी बोलताना केला.
यशवंत महिला स्वयंरोजगार प्रतिष्ठानच्या माध्यमातून 10000 हून अधिक महिलांपर्यंत यशवंत बँक बचतगटांच्या स्वरुपात पोहोचलेली आहे. यातून रोजगार निर्मिती व खेडोपाडी तळागाळापर्यंत जिथे बँकिंग सेवा उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी बचत खाती उघडणे व अर्थसहाय्य करणे या स्वरुपाचे कामाकाज आपली बँक करीत आहे. सुमारे 15 कोटीहून अधिक रकमेचे अर्थसहाय्य या बचतगटांच्या माध्यमातून बँकेने केलेले आहे. भारत सरकारच्या महिला कल्याण व बालविकास मंत्रालयाच्या माध्यमातून रु. 1 कोटींचा निधी अल्प व्याजदरामध्ये बँकेस प्राप्त झालेला असून महिलांच्या अर्थसहाय्यासाठी यशवंत बँक त्याचा विनियोग करीत आहे. पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा निधी प्राप्त होणारी आपली एकमेव बँक असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. सहभाग कर्ज योजनेअंतर्गत जनता सहकारी बँक लि. पुण (शेड्युल्ड बँक) व चिखली अर्बन को-ऑप बँक चिखली (बुलढाणा) इ. बँकांच्या सहकार्याने उत्तम पद्धतीचे कामकाज चालू आहे.
सहकारातील पतसंस्था, वित्तिय संस्था व बँका यांना दैनंदिन कामकाजामध्ये प्रशिक्षणाची गरज असल्याने ह.भ.प. श्री बाबामहाराज सातारकर यांच्या श्री क्षेत्र दुधिवरे (लोणावळा) येथील आश्रमात भव्य प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले असून संपूर्ण महाराष्ट्रामधून बँका, पतसंस्था व एनजीओ यांच्या नियमित प्रशिक्षणाचे काम या प्रशिक्षण केंद्रामार्ङ्गत दिले जाते. येथे सुमारे 80 प्रशस्त खोल्यांद्वारे प्रशिक्षणार्थींसाठी निवास व भोजनाची उत्तम व्यवस्था केलेली आहे.
सध्याच्या धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनात निसर्गोपचाराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. याचा विचार करुन लोणावळा येथे निसर्गोपचार शिबिरांचे आयोजन करण्यात येते. मुंबई येथिल प्रसिद्ध डॉ. सौ. कुमुद जोशी या प्रशिक्षण शिबीराचे व प्रकल्पाचे काम पहात असून अनेक मान्यवर, सिने कलकार, ज्येष्ठ नागरिक तसेच बँकेचे सभासद ग्राहक ही याचा लाभ घेत आहेत.
सर्व सामान्य मध्यमवर्गीय लोकांचे गृहस्वप्न साकार करण्यासाठी यशवंत उद्योग समूहाने कराड येथील चचेगांव परिसरात भव्य 40 एकर अशा निसर्गरम्य व ऐतिहासिक आगाशिव डोंगरांच्या पायथ्यांशी एन.ए. प्लॉट्स विकसित केले असून गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून माङ्गक दरामध्ये याची विक्री सुरु आहे.
श्री चरेगांवकर यांचे कुशल नेतृत्त्व, कल्पकता व इतर सर्वांच्या लाभलेल्या सहकार्यामुळे यशवंत उद्योग समूहास हे यश प्राप्त झाले आहे. या संदर्भात अनेक मान्यवर मंडळींनी श्री. शेखर चरेगांवर यांचे अभिनंदन केले.

Map of Yashwant Bank