Vivekananda Pratishthan-BGSV

Savkheda Shivar, Jalgaon, 425101
Vivekananda Pratishthan-BGSV Vivekananda Pratishthan-BGSV is one of the popular School located in Savkheda Shivar ,Jalgaon listed under School in Jalgaon ,

Contact Details & Working Hours

More about Vivekananda Pratishthan-BGSV

सध्याचे शालेय शिक्षण हे फक्त पाठ्यपुस्तकाचे शिक्षण आणि परिक्षांचे आयोजन यातच अडकून पडलेले आहे. हे शिक्षण कंटाळवाणे, निरस आणि ध्येयहीन आहे.

आपल्या शालेय शिक्षणाचे ध्येय नक्की काय असावे? ज्ञानदानाची उज्ज्वल परंपरा असलेल्या देशाला खरंतर ही बाब नवीन नाही परंतु गेल्या काही शतकात विस्मृतीत गेली आहे. स्वामी विवेकानंद, रविंद्रनाथ टागोर, महात्मा गांधी यांनी पुन्हा पुन्हा हे सांगितले आहे की शिक्षण म्हणजे आपल्यातच असलेल्या सुप्त गुणांचा असा आविष्कार जो तुमचे व्यक्तिमत्व घडवेल, ज्यामुळे अनेक संधींची उपलब्धता निर्माण होईल आणि एक बलशाली आणि संपन्न राष्ट्रनिर्मिती होईल.

What should be exactly the goal of education in our school ? Really it is nothing new to our nation with long tradition of successfully imparting system of education, but lost during the past centuries. Swami Vivekanand , Ravindranath Tagore, Mahatma Gandhi have time & again defined that education is to manifest what is already within oneself, to build character, to provide wide scope of opportunity so as to enable one to have his potential developed & to see a strong prosperous nation . We have successfully achieved all these objectives of education in our school Late. Smt. B.G.Shanbhag Vidyalaya.



"केवळ शाळा नव्हे जीवनविषयक दृष्टिकोन देणारे गुरुकुल "..ह्या हेतुने आणि ह्याच ब्रीद वाक्यासोबत शैक्षणिक क्षेत्राला निव्वळ परीक्षा,घोकमपट्टी या जोखडातुन बाहेर काढुन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे उदात्त उद्दिष्ट्य साध्य करण्याच्या हेतुने सन. १९८१ मध्ये डॉ. अविनाशजी आचार्य आणि त्यांच्या सहकार्यांनी 'विवेकानंद प्रतिष्ठान' या शैक्षणिक संस्थेचे बीज रुजवले..

संस्थेचे रजिस्ट्रेशन झाल्यावर २५० रुपये एवढी मेंबरशिप फी ठरवली गेली..संस्थेच्या सुरवातीपासुन राराविकर सर,भंवरलालजी जैन, रतनलालजी बाफना आदी सोबत होते..संस्था रजिष्टर झाली तरी जागेचा प्रश्न सुटलेला नव्हता..त्यासाठी नगरपालिका,सरकारचे ऊंबरठे झिजवुनही काही उपयोग होत नव्हता..जागेसाठीची ही धडपड ८७ च्या मार्च-एप्रिल मध्ये प्रो. शानभाग यांच्या कानावर गेली असता..त्यांनी डॉ. आचार्यांची भेट घेउन सावखेडा शिवारातील निसर्गरम्य परिसरात असलेल्या त्यांच्या ६० एकर जमिनी पैकी १० एकर जमीन देऊ केली..पण त्याकाळी फक्त लिंबु फॅक्टरी पर्यंतच रस्ता होता..बर्‍याच विरोधानंतर-चर्चेनंतर तेथे शाळा सुरु करण्याचे ठरले..

ह्याच सुमारास भरत अमळकर सर, जे.जे.पाटील सर, लिमये सर या कार्यात सहभागी झाले..

तिथे भुमीपुजन होउन कामास सुरवात करण्यात आली..सुरवात लिंबु फॅक्टरी पासुन शाळेच्या नियोजित जागे पर्यंत डबर टाकुन किमान मटेरिअलचा ट्रॅक्टर जाईल असा रस्ता बनवण्यापासुन झाली..तीन वर्षात त्या जागी पाच वर्ग बांधुन झाले..

ते वर्ग बांधुन होईस्तोवर तत्कालीन विधानसभा आमदार शरद वाणी यांनी गिरणा पंपिंग च्या रेस्ट हाऊस च्या खोल्यांमध्ये शाळा सुरु करण्याची परवानगी दिली..परंतु त्या खोल्या त्यापुर्वी २० वर्षापासुन उघडल्या देखील नव्हत्या..तोपर्यंत तेथे सर्पराजांचे वास्तव्य होते. त्या खोल्यांची साफसफाई करुन तिथे पाचवीचा वर्ग सुरु करण्यात आला..तिथे पिंप्राळ्याच्या शाळेत जाणार्‍या सावखेड्याच्या मुलांचा चांगला प्रतिसाद मिळाला..कारण त्याना गणवेश,वह्या-पुस्तके आदि मोफत दिले पण शाळेत उपस्थिती मात्र नगण्य असे..त्यामुळे मुख्य उद्देश बाजुला पडतो की काय असे वाटले..बरीच मुले नापास..तीसर्‍या वर्षी सगळ्यांनी प्रवेश रद्द केले.. मग त्यावर उपाय म्हणुन थोरात ट्रान्सपोर्ट कडुन एक बस भाड्याने घेउन जळगावातुन मुले आणण्याचा निर्णय घेतला..पहिल्या वर्षी वेगवेगळ्या ईयत्तांमधली सात मुले मिळाली..त्या सात मुलांवर वर्षभर शाळा चालली..

गावातही अप्पा महाराज समाधी येथे बालवाडीचा वर्ग चालु केला..

आता खोल्या बांधुन झाल्याने शाळा नवीन ईमारतीत स्थलांतरीत झाली..दुसर्‍या वर्षी जळगावातुन तब्बल ५० मुले तर तीसर्‍या वर्षी १५० मुले मिळाली.. सावखेड्याच्या गावकर्‍यांकडुन थोडा त्रास झाला पण नंतर हळु हळु करत तीही मुले शाळेत प्रवेश घेउ लागली.. गावातील शाळेलाही स्वरुप यायला लागले बालवाडीपासुन तिथे नर्सरी, केजी१,केजी२ हे वर्ग सुरु झाले..

त्याच वर्षी शाळेने अनुदान घ्यायचे ठरवले..आणि ते मंजुर होऊन पहिला २५ हजाराचा धनादेश मिळताच तत्कालीन शिक्षक-मुख्याध्यापकांनी तो आनंद गैर मार्गाने साजरा केला. टिपिकल ग्रँटेड शाळा आणि आपल्यात फरक काय? त्यामुळे त्या सर्वांना तत्काळ निलंबित करुन अनुदानही न घेण्याचा धाडसी निर्णय अशा बिकट परिस्थितीतही मॅनेजमेंटने घेतला. कारण शाळेचे मुळ उद्दिष्ट्यापासुन दुर जात असल्याचे जाणवत होते.. असे स्वरुप अपेक्षित नव्हते.. ग्रँट नाकारल्याने समोर उभा असलेला आर्थिक प्रश्न तीव्र होण्याच्या आत बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाणता राजाने यातुनही तारुन नेले..जाणता राजा ह्या महानाट्याने संस्थेची सकारात्मक प्रसिद्धी तर झालीच पण आर्थिक बाजुसही हातभार लागला..यावेळी राजु नन्नवरे हे येऊन मिळाले.. यातुनच ब. गो. शानभाग विद्यालयाचा आणि सुयोग कॉलनीतील शाळेचाही ग्राऊंड फ्लोअर बांधुन झाला..

प्रामाणिक कष्ट आणि संस्थेचा नावलौकिक पाहुन सुरेशदादा जैन ह्यांच्या सहकर्याने संस्थेने सुयोग कॉलनी परिसरात जागा मिळवली होती..बांधकाम झाल्यावर लाठी शाळेच्या खोल्यांमध्ये सुरु असलेली प्राथमिक शाळा सुयोग कॉलनीतील नवीन ईमारतीत स्थलांतरित करण्यात आली. यातुनच संस्थेला स्थिरता व स्वरुप येत गेले.. १०० रुपये डिपॉझिट आणि १० रुपये फी यातुन खर्च कसा भागणार, तरीही ग्रँटेड शाळेची अप्वॉईंटमेंट लेटर असुनही..केवळ शाळेच्या उद्दिष्टाने भारावुन गेलेल्या, शिक्षणासाठी खरंच काहीतरी करण्याची आस असलेल्या शिक्षकांच्या साथीने आणि काही उत्साही सुजाण पालकांमुळे शाळेचा उत्कर्ष होत राहिला..संस्थेची गुणवत्ता वाढीस लागली..

'जळगावात २५ शाळा असतील तर त्यात भर २६ वी शाळा' असे उद्दिष्ट्य नव्हते तर विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकी ज्ञाना बरोबरच त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हे मुळ उद्दिष्ट होते. त्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगभुत कलांची जाणीव करुन देऊन त्यांचा उत्कर्ष घडवणे व शारिरिक, मानसिक, बौद्धिक, सांस्कृतिक व सामाजिक या सर्व पातळ्यांवर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा चौफेर,सर्वांगीण विकास व्हावा हाच मुख्य हेतु होता.. स्थापनेच्या वेळी पुण्यातील नामवंत अशा अप्पा पेंडसेंच्या 'ज्ञान प्रबोधिनी प्रशालेचा' आदर्श डोळ्यासमोर ठेवुनच विवेकानंद प्रतिष्ठान चा श्री गणेशा झाला.. शाळेत शालेय शिक्षणाबरोबरच मुलांची विविध अंगाने जोपासना होण्यासाठी वैविध्यपुर्ण कार्यक्रम राबवले जातात..

त्यात प्रामुख्याने उल्लेख होईल तो 'शिक्षक प्रशिक्षण' ह्याचा.. अतिशय प्रगल्भ असा विभाग..याद्वारे वर्षभरात ४० यशस्वी कार्यक्रम राबवले जातात..यामागची भुमिका अशी की आपण शाळेत नियुक्त करत असलेला शिक्षक देखील सर्वसामान्य समाजातुनच येतो..म्हणुन त्या शिक्षकाला संस्थेला अपेक्षित असा आकार देण्याचे काम होते..हळु हळु ह्या विभागाचा आवाका वाढत आहे..ईतर शाळांकडुनही ह्या प्रशिक्षणाची मागणी होत आहे..याद्वारे दुसर्‍या शाळेतील शिक्षकांचाही दर्जा सुधारुन,सामाजिक स्तर उंचावण्यास मदत होत आहे.. संस्था शाळेतील शिक्षकांचा व त्यांच्या कुटुंबाचा आरोग्य विमा उतरवते..

विद्यार्थी शिक्षकांना सर,टीचर, मॅडम असे न उल्लेखता आचार्यजी व दिदी असे संबोधतात..तर मुख्याध्यापकास प्रधानआचार्यजी.. शाळेच्या तुकड्यांनाही श्रेणीच्या बंधनातुन मुक्त करुन जास्वंद-पारिजात,लव-कुश, राम-कृष्ण,केशव-माधव,गार्गी-मैत्रेयी, दुर्गा-लक्ष्मी अशी नावे आहेत.. तसेच शाळेच्या परिसरात खुप मोठी झाडे आहेत त्याच्या सावलीत पार बांधले आहेत बर्‍याच वेळेला शिक्षक पारावर निसर्गाच्या सानिध्यातच विद्यादानाचे कार्य करतात..पुर्वीच्या महान गुरुशिष्य परंपरेची थोडीशी झलक यातुन मिळतेच.. शाळेत असलेला अजुन एक उल्लेखनीय उपक्रम म्हणजे 'छंद वर्ग' यातुनच दुर्गा झाली गौरी सारखे महा नृत्यनाट्य, विद्यार्थ्यांचा वाद्यवृंद, राष्ट्र का हुंकार हे कार्यक्रम शाळेतील मुलांनीच साकारलेत..तसेच दरव र्षी विवेकानंद जयंतीच्या वेळी साजरा होणारा सांस्कृतिक कार्यक्रम 'रंगतरंग' हा उल्लेखनीय असतो.नृत्य,नाट्य,वक्तृत्व-नेत्तृत्व, चित्रकला-हस्तकला,रांगोळी,आनंदमेळावा अशी पर्वणी असते. घोडेस्वारी, क्रिडासप्ताह होतो...यासाठी भव्य मैदान आहे. यात मुलांच्या विविध कलागुणांचे दर्शन होते. तसेच आषाढी एकादशीला दिंडी..रक्षाबंधन,दहिहंडी-गोपाळकाला,गणेशोत्सव आणि राष्ट्रीय सण, महापुरुषांच्या जयंती या प्रसंगी सुट्टी न देता ते कार्यक्रम शाळेत वेगळ्या पध्दतीने साजरे केले जातात. यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात मदत होते, सुजाण नागरिक म्हणुन पायाभरणी होते.. हे आणि यासारखे अनेक उपक्रम शाळा अतिशय उत्साहात राबवत असते..आणि यात सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग हा उल्लेखनीय आहे.. शिक्षणाच्या विविध टप्प्यांवर अभिरुची,अभिक्षमता मापन(७वी),अभ्यास सवय(९वी), वर्तवणुकी संबंधीच्या चाचण्या दिल्या जातात,त्यावर तज्ञांमार्फत काऊंसिलींग होते. या चाचण्यांचा उपयोग विद्यार्थ्यांना अभ्यासाची व करिअरची दिशा ठरवण्यात होतो.

तसेच प्रत्येक वर्षाच्या सुरवातीला प्रत्येक विद्यार्थ्यास वर्षभराचे शैक्षणिक प्लॅनिंग तसेच वर्षभरातील सुट्ट्या,परीक्षा,पालकसभा,सहली,शैक्षणिक (खर्‍या अर्थाने) सहली यांचे नियोजन असणारी एक दिनदर्शिका मिळत असते..त्यात ह्या नियोजनासोबतच..मुलांचे चित्र, शिक्षकांचे लेख, प्रार्थना, देशभक्तीपर गीते..यांचाही समावेश असतो..

तसेच शिक्षण विषयक मासिक पत्रिकाही मिळते.. ऑनलाईन एज्युकेशन व व्हर्चुअल क्लासरूम हे वैशिष्ट्य आहे.. शाळेच्या ईमारतीत स्वतंत्र कलादालन आहे, सुसज्य ग्रंथालय, संगणक कक्ष, अभ्यास वर्ग, ईंग्लिश स्पिकिंग, स्कॉलरशिप, ड्रॉईंग ग्रेड परीक्षा,टिमवि गणिताच्या परीक्षा,हिंदी च्या सरकारी परीक्षा ईत्यादी उपक्रम आणि १०वी बोर्डाच्या परीक्षेतही विद्यार्थी मेरीट मध्ये येतात.. प्रशस्त वसतिगृह आहे..तसेच वसतिगृहाजवळच संस्थेचाच मातोश्री वृध्दाश्रम हा प्रकल्प आहे..यातुन निराधार वृध्द आजी आजोबांना नातवंडांचा तर वसतिगृहातील मुलांना आजी-आजोबांच्या सहवासाचा लाभ होतो..मोठ्यांचे संस्कार मिळतात.. गावात राहणार्‍या मुलांसाठी स्कुल बस तसेच अ‍ॅपे रिक्षा यांची सोय आहे..स्कुल बसलाही अश्वमेघ,चेतक,पवन,पुष्पक अशी वैविध्यपुर्ण नावे आहेत.. चालकही अतिशय मनमिळाऊ ,काळजीवाहु ,प्रेमळ व अनुभवी आहेत..प्राथमिक शाळेतील रिक्षाचालक तर मुलांना वर्षाच्या शेवटी एखाद्या बागेत नेऊन सेंडऑफ ही देतात.. यांची जबाबदारीही शाळा झटकुन न देता त्यांचा व कुटुंबाचा आरोग्य विमा उतरवते...

शाळेतच मुक-कर्णबधीर विद्यालयही आहे..तसेच कम्युनिटी कॉलेज.,सेमी ईंग्लिश माध्यम, काळाची गरज ओळखुन आता सी.बी.एस.ई. हा स्वतंत्र विभाग चालु करण्यात आला आहे. अशाप्रकारे शाळेची यशस्वी वाटचाल अखंड चालु आहे.. शालेय शिक्षणानंतर सुरु होणार्‍या भावी आयुष्यात ह्या शाळेतील सर्वांगीण शिक्षणाचा अतिशय बहुमोल असा उपयोग झालेला आढळुन येतो..शाळेतुन बाहेर पडलेली बहुतांश मुले आपल्या आवडीच्या क्षेत्रात यशस्वीपणे मार्गस्थ झालेली आहेत.. अशा शाळेचे आम्ही विद्यार्थी असल्याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे..

Map of Vivekananda Pratishthan-BGSV