VIDA Vision Integrity Development Association Nashik

913/A, LONDHE LANE, SINNAR , TAL SINNAR , DIST NASHIK, Sinnar, 422103
VIDA  Vision Integrity Development Association Nashik VIDA Vision Integrity Development Association Nashik is one of the popular Community Organization located in 913/A, LONDHE LANE, SINNAR , TAL SINNAR , DIST NASHIK ,Sinnar listed under Education in Sinnar ,

Contact Details & Working Hours

More about VIDA Vision Integrity Development Association Nashik

Why VIDA

व्हिजन इंडिया डेव्हलपमेंट असोसिएशन महाराष्ट्र (VIDA )

विडा ही कुठल्याही राजकिय पक्षाशी निगडीत अथवा संबंधीत नाही.
या संघटनेमार्फत पुरोगामी महापुरुषांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करते.
ही संघटना कुठल्याही जाती,धर्म , आणि पक्षाच्या विरोधात नसुन सर्वाना सोबत घेवुन चालनारी संघटना आहे. विडा हे विद्यार्थी व जनतेच्या लोकहित वादी संघटन आहे.
लोकशाही मार्गाने एकत्र येवुन व कायद्याला अनुसरुन सर्वसामान्य जनतेसाठी शैक्षणिक,व्यवसाय, शिबीरे, कार्यशाळा, पथनाट्य, सभा, सम्मेलन, धरणा आंदोलन,मोर्चा व स्वराज्य संघटनेच्या निवडणुकांत भाग घेणे.आदी मार्गाने संघटना सतत कार्यरत राहणार आहे.
VIDA चे ध्येय व उद्दिष्टे :

१) ” मानवता हाच खरा धर्म ” हे तत्व स्विकारुन राष्ट्रातील नागरिकांना जाती-धर्माच्या बंधनातून मुक्त होण्यास प्रवृत्त करणे.
२) युवक – युवतींमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना वृद्धिंगत करुन राष्ट्रप्रेम , राष्ट्रभक्ती व राष्ट्रसेवेसाठी प्रवृत्त करणे.
३) समाजिक बांधिलकी जोपासुन सर्व जात-पात-धर्म-वर्ण-पंथ भेदभाव नष्ट करुन लोकशाहीच्या तत्वाने व संविधानात्मक मार्गांने वाटचाल करणे.
४) समाजसेवेसह सामाजिक प्रबोधनाकरिता विविध उपक्रम राबविणे.
५) निसर्गातील पर्यावरणाच्य रक्षणाकरिता वृक्ष लागवड , वृक्ष संवर्धन व तत्सम उपक्रम राबविणे.
६) विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करणे , स्पर्धा परिक्षा घेणे.
७) अंधश्रद्धाचे निर्मूलन करुन वैज्ञानिक चिकित्सेला प्रोत्साहन देणे.
८) सर्व स्तरातील जनतेचे जसे महिला , बालक , विद्यार्थी , शेतकरी, शेतमजूर, कामगार , बेरोजगार तरूण यांच्या समस्यांना वाचा फोडणे.

Map of VIDA Vision Integrity Development Association Nashik