Shree Ram Mandir, Malad

Mumbai, 400064
Shree Ram Mandir, Malad Shree Ram Mandir, Malad is one of the popular Hindu Temple located in ,Mumbai listed under Hindu Temple in Mumbai , Religious Organization in Mumbai , Social Service in Mumbai ,

Contact Details & Working Hours

More about Shree Ram Mandir, Malad

सोमवार बाजार मालाड (प.) येथील ११२ वर्षे पुरातन श्रीराम मंदिर मालाड मधील भाविक रहिवाशांच्या श्रद्धा व आस्थेचे एक केंद्र बनले आहे. या मंदिर परिसरात श्रीराम मंदिर, श्री शंकर, श्री गणपती, श्री हनुमान, श्री दत्त, आणि ग्रामदेवी श्री पाटलादेवी यांची मंदिरे भक्तांना आशीर्वाद देत विद्यमान आहेत. काही मंदिरे १८०५ पासून उभी आहेत. धार्मिक वृत्तीचे दानशूर श्री गणपत जीवनजी महंत यांनी १९०२ साली त्यांचे गुरू श्री हरीनंदन स्वामी यांच्यासामाधीवर श्रीराम मंदिर निर्माण केले. त्यांचे वारस श्री पुरुषोत्तम दादोबा उर्फ भाई महंत यांनी १९७८ साली मंदिराच्या परिसराची जागा मालाड देवस्थान टृस्ट या सार्वजनिक न्यासाकडे हस्तांतरीत केली. तेव्हापासून मालाड देवस्थान टृस्टच्या वतीने अतिशय चांगल्या प्रकारे मंदिराचे व्यवस्थापन करण्यात येत आहे. मंदिरामध्ये धार्मिक पूजा-अर्चा त्याबरोबरच विविध समाजसेवी, शैक्षणिक उपक्रम ही राबविण्यात येतात. समाजातील विभिन्न संप्रदाय, संस्था तर्फे सत्संग, प्रवचन, संगीत आणि व्याख्यानाचे अनेकविध कार्यक्रम मंदिरामध्ये नियमित होत असतात.

Map of Shree Ram Mandir, Malad