PurushottamDharvadkar

Manjri Pune, Pune, 412307
PurushottamDharvadkar PurushottamDharvadkar is one of the popular Hindu Temple located in Manjri Pune ,Pune listed under Political Candidate in Pune ,

Contact Details & Working Hours

More about PurushottamDharvadkar

श्री पुरुषोत्तम (आण्णा ) धारवाडकर यांच्या बद्दल
माजी सरपंच मांजरी बु

मु. पो. घुले वस्ती, मांजरी बु ।।, ता. हवेली, जि. पुणे ४१२३०७
मोबाईल नं. : ९३७०२२२८५९
जन्मतारीख : २०/१०/१९७०
मी गेली अनेक वर्षे सामाजिक कामासाठी स्वतःलावाहून घेतले आहे. सामाजिक कामाची आवड शालेय जीवन पासून निर्माण झाली. काव्य, कथा आणि लेखनामध्ये विशेष रूची.
१९ जून १९६६ रोजी शिवसेनेचा जन्म झाला. छ्त्रपती शिवाजी महाराज हे शिवसेनेचं आराध्य दैवत. महाराज भवानी मातेचे प्रखर भक्‍त होते. ‘वाघ’ हे आई भवानीचं वाहन. म्हणून शिवसेनेचं बोधचिन्ह ‘वाघ’ असावं असं बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात आलं. वाघ म्हणजे रुबाब, मस्ती अन्‌ आक्रमकपणा. शिवसेनेचे सार व्यक्त होणार्‍या बोधचिन्हाला खुद्द बाळासाहेबांनीच साकारले. शिवसेना हे नाव बाळासाहेबांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनीच सुचवले होते. महाराष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी सिद्ध झालेल्या शिवसेनेचा पहिला मेळावा ३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवतीर्थावर आयोजित करण्यात आला. ‘मार्मिक’ वगळता इतर कोणत्याही वर्तमानपत्रात शिवसेनेच्या शुभारंभाच्या मेळाव्याची घोषणा अथवा जाहिरात नव्हती. तरीही मुंबई आणि महाराष्ट्रातल्या अन्य भागांतून मेळाव्याला भरघोस प्रतिसाद मिळाला. शिवाजी पार्क खच्चून भरलेले, रस्ते तुंबले, गल्ल्या भरल्या होत्या. महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्फूर्तिदायक चरणांवर प्रतिज्ञेचा माथा ठेवून दृष्ट लागवी असा स्थापना मेळावा झाला. चैतन्यमय आणि संघर्षशील असे शिवसेनेचे सुरुवातीचे दिवस होते. पहिली सभा दणक्यात झाली. त्यानंतर मराठी तरुणांचे तांडे शिवसेनेकडे वळू लागले. ‘मार्मिक’वर वाचकांच्या उड्या पडत होत्या. बाळासाहेबांच्या वाणीला आणि शब्दांना एक वेगळीच धार चढत होती. व्यायामशाळा, स्थानिक क्रीडा संस्था अन्‌ गणपती-गोविंदा मंडळं यांच्या मदतीने सेनेचं ‘नेटवर्किंग’ जोरात सुरू झालं होतं. मराठी माणसांचं हक्काचं माहेरघर म्हणून शिवसेनेची घोडदौड सुरू झाली.

मी श्री पुरुषोत्तम (आण्णा ) शिवाजी धारवाडकर वयाच्या २५ व्या वर्षी समाजकारण हेच राजकारण हे ध्येय मनाशी बाळगून या क्षेत्रात कार्यरत झालो. त्यानंतर वयाच्या ३१व्या वर्षी मांजरी-लोणीकाळभोर गटातून जिल्हा परिषद पुणे या पदासाठी निवडणूक लढून ७५ मतांनी अनपेक्षित पणे पराभूत झालो. त्यानंतर आदरणीय श्री बाळासाहेब केशव ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेना प्रवेश केला

मा. सुरेश आण्णा घुले यांनी दिलेल्या आदेशा नुसार २००७ साली ग्रामपंचायत मांजरी बु मध्ये वार्ड क्र २ मध्ये निवडणूक लढवून प्रचंड बहुमताने निवडून आलो व त्यानंतर झालेल्या सरपंच पदाच्या इलेक्शन मध्ये बिनविरोध निवडून आलो त्यानंतर संपूर्ण मांजरी गावाची धुरा हाती घेतल्यानंतर सर्व प्रथम

मांजरी बुद्रुकचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मा. सुरेश आण्णा घुले यांच्या नेतृत्वा खाली प्राधिकरण या योजनेचा पाठपुरावा करण्यास सुरवात केली.

त्यानंतर मा. उपमुख्यमंत्री मा अजित दादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शना खाली मा लक्ष्मणराव ढोबळे, पाणी पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या कडून पाटबंधारे खात्याची जमीन सदर योजनेसाठी मिळविण्यास यश आले.

मांजरी बुद्रुक ग्रामपंचायतीकडे १०% लोकवर्गणी भरणे शक्य नसल्यामुळे मा सुरेश आण्णा घुले यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार यांच्याकडे मागणीकेली असता देवाची उरुळी व फुरसुंगी यांच्या कचरा डेपोच्या त्रासामुळे लोकवर्गणी महानगरपालिका, पुणे यांनी असून मांजरी बु गावाला शुद्ध कचरा डेपोच्या त्रास असून त्यामुळे मांजरी गावाची सुद्धा लोकवर्गणी महानगरपालिकेने असा आदेश त्यांनी महापौर दत्तात्रय धनकवडे यांना दिला.
त्यानुसार त्यांनी ती वर्गणी भरली त्यानुसार हि क्सिम साधारणपणे सन २०१७ रोजी मार्गी लागली.

तसेच सरपंच पदावर कार्यरत असताना मांजरी बु गावातील जनतेला प्रामुख्याने भेडसावत असणारा प्रश्न म्हणजे ड्रेनेजचा हा प्रश्न मार्गी लावताना मांजरी बु मधील सर्व गल्ली बोळ कॉलन्या भूमिगत गटार लाईन वरून तो प्रश्न मार्गी लागला तसेच मांजरी परिसरातील रस्ते काँक्रीटीकरण व डांबरीकरण केले. मांजरी स्मशानभूमी अद्यावत व चांगली करून दिली.

मांजरी मधील सर्व अंतर्गत स्ट्रीट लाईट ची व्यवस्था करून दिली तसेच मांजरी बु मधील मुस्लिम समजासाठी दफन भूमी करून दिली. मांजरी बु गावासाठी विहिरीवरून तात्पुरत्या स्वरूपाची पाणी योजना करून दिली महादेवनगरला नवीन कॅनॉल जवळ विहीर घेऊन त्या विहिरीवरून महादेवनगर वासियांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले.

तसेच ग्रामपंचायत हद्दीतील वार्ड क्र २ गोपाळपट्टी व वार्ड क्र ५ सोलापूररोड च्या नागरिकांना बोअरवेल मधून पाइपलाइनद्वारे घरोघरी पाणी उपलब्ध करून दिले.

त्यानंतर मांजरी बु मधील वार्ड क्र १ ते वार्ड क्र ६ (मांजरी बु ) मध्ये सुमारे ८ ते ९ कोटी रुपयांची सन २००७ ते २०१२ च्या दरम्यान विकास कामे करण्यात यश आले. याचा सदर पुरावा सोबत जोडला आहे त्याच बरोबर सरपंच पदाची धुरा वाहत असताना सन २००७ ते आता पर्यंत पाणी पुरवठा अध्यक्ष म्हणूनही काम पाहत आहे.

Map of PurushottamDharvadkar