First Breath Band

Maharashtra, -NA-,
First Breath Band First Breath Band is one of the popular Band located in Maharashtra ,-NA- listed under Band in -NA- ,

Contact Details & Working Hours

More about First Breath Band

Keep Breathing, Keep Singing असा सगळ्यांना सांगणारा 'First Breath Band'. ह्या Band विषयी सगळ्यांना खूप उत्सुकता लागली आहे.

महाविद्यालयात असताना निनाद म्हैसाळकर ह्याने हा 'First Breath Band' सुरु केला होता. पेशाने संगीतकार आणि Sound Engineer असणारा निनाद गेल्या अनेक वर्षापासून संगीत क्षेत्रात धडपडत आहे.

स्वतःच्या भाच्याला जेवताला Bollywoodची उडती गाणी लागतात, तसेच सध्याच्या वाढत्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या लहान मुलाचं बालपण हरवत जातंय. आयुष्यात पुढे जात असताना खूप काही राहतंय किंवा अनुभवायलाच येत नाहीये असे काहीसे झालय सद्ध्याच बालपण आणि हरवतंय ते सध्याच्या सुपर फास्ट स्पर्धेत.

आपल्या पीढीसाठी मंगेश पाडगावकर, राजा मंगलवेढेकर, विंदा करंदीकर तसेच बालकवी ह्यांनी आपल्या साहित्यातून आपल्याला बरेच काही दिले परंतु जवळ जवळ २७ वर्ष झाली ह्या दिग्गजांनी रुजू केलेल्या ह्या बालपणात त्या गोड आठवणी सध्याच्या लहान मुलांना जगताच येत नाहीयेत. ह्यासाठी वाढलेली स्पर्धा हेच एकमेव कारण नसून आपण आपली तरुण पिढी, त्यांचे पालक जबरदार आहेत.

एक संगीतकार म्हणून विविध एकांकिका, नाटक तसेच चित्रपट यांचे संगीत करत असताना आपण काय वेगळ केल? आपण काय दिले ह्या येणा-या पिढीला? बर, आपण वेगळ काही देऊ शकलो नाही आपल्यासाठी बाळकडू, संस्काराचे मोती ठरणा-या ह्या आदि साहितीकांची बालगीते पुनर्जीवित करून हल्लीच्या मुलांसाठी त्यांच्या समोर घेऊन यायची हाच प्रामाणिक, निस्वार्थी आणि निरागस प्रयत्न केला निनाद म्हैसाळकर ह्यांनी.

फक्त लहानंसाठीच नव्हे तर आपले बालपण Miss करणा-या त्या प्रत्येक व्यक्तीसाठी 'First Breath Band' चा हा नवीन उपक्रम आहे.

ह्या Superfast Globalized आणि सतत भविष्याच्या मागे धावणाऱ्या लोकांना स्वतासाठी मोकळा श्वास घेता यावा, आपल्या गोड आठवणींना आठवण्यासाठी थोडा वेळ मिळावा म्हणूनच 'नाट्यखाज थिएटर्स' सोबत निनाद म्हैसाळकर घेऊन येत आहे 'First Breath Band' - Keep Breathing, Keep Singing.

Map of First Breath Band