Balvikas Vidyamandir

Signal Camp, Vidya Nagar, Latur, 413512
Balvikas Vidyamandir Balvikas Vidyamandir is one of the popular Education located in Signal Camp, Vidya Nagar ,Latur listed under Education in Latur , High School in Latur ,

Contact Details & Working Hours

More about Balvikas Vidyamandir

स्वामी विवेकानंद म्हणातात,
“शिक्षण म्हणजे निरंतर चालणारी प्रक्रिया ज्यात चारित्र्यघडण होत, मन:शक्ती वाढते, बौद्धीक क्षमता तीक्ष्ण होतात आणि ज्याचा परिणाम कि आपण आपल्या पायावर अढळ उभे राहू शकतो.”

१९९२ साली बालविकास विद्यामंदिर सुरु झाली. सौ. मालती देशपांडे यांनी आपल्या अनुभवांची शिदोरी मुलांसाठी अभ्यासपूर्वक उघडण्यास सुरुवात केली. शाळा ही अभ्यासक्रम शिकविण्यासाठी नसून मुलांना "कसं शिकावं ?" हे शिकविण्यासाठी असावी. या विचारातून, कालानुरूप बदल करत, मुक्त अभ्यासक्रम तयार करण्याचा प्रयत्न केला. मुलांना शाळेमधून ज्ञानाच्या बरोबरीनेच संस्कार, समाजशीलता आणि देशभक्तीचे रोपण व्हावे, तसेच विद्यार्थ्याला 'यशस्वी होणे' यात 'माणूस होणे' हे पण अभिप्रेत आहे, असा संदेश मिळावा, असाही आमचा प्रयत्न असतो. तुमच्या प्रतिक्रियांमधून तो बहुतांशी यशस्वी झाल्याचेहि कळले.

स्वभाषेच्या माध्यमातून आणि आजूबाजूच्या पर्यावरणातून मूल शिकते तेव्हा शिकणे सहजपणे घडते. शिकलेले व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग बनते. म्हणूनच बालविकासचे माध्यम मराठी आहे. हिंदी आणि जगन्मान्य असलेली इंग्रजी या भाषांची ओळख, गाणी-गोष्टी-चित्रांद्वारा बाल गटापासून होते. मराठीच्या भक्कम पायावर ह्या दोन्ही भाषांचे औपचारिक शिक्षण सुरु होते.

कृती आणि उपक्रमातून शिक्षण हे बालविकास चे वैशिष्ट्य आहेत. उपक्रम असे कि ज्यांनी मुलांना माहिती तर मिळेलच पण त्यापेक्षा त्याच्या कुतूहलमध्ये आणि प्रश्नांमध्ये वाढ होईल. आणि त्यांची उत्तरे शोधायला त्यांना मदत करणे म्हणजे त्यांचा अभ्यास घेणे अस आम्ही मानतो.

आम्ही मुलांना हुशार नाही करत, कारण ती मुळात हुशारच असतात, असा आमचा विश्वास आहे. आम्ही त्यांना चांगला विद्यार्थी होण्यासाठी तयार करतो आणि एवढाच आमच काम...!


मोलाचा वाटा
शाळेची भूमिका समजून घेऊन आणि आमच्यावर पूर्ण विश्वास टाकून, आम्हाला सतत मदत करणाऱ्या आणि आपल्या अनुभवांच्या शिदोरीतून मोलाचे कण देणाऱ्या पालकांचा बालविकासच्या आजपर्यंतच्या वाटचालीत मोलाचा वाटा आहे.

Map of Balvikas Vidyamandir