पुरंदर जेनेरिक मेडिसीन स्टोअर

Mandar Complex, Opp. ST Stand, Saswad, Tal-Purandar, Pune, 412301
पुरंदर जेनेरिक मेडिसीन स्टोअर पुरंदर जेनेरिक मेडिसीन स्टोअर is one of the popular Pharmacy / Drugstore located in Mandar Complex, Opp. ST Stand, Saswad, Tal-Purandar ,Pune listed under Medical & Health in Pune , Drugstore in Pune , Medical & health in Pune ,

Contact Details & Working Hours

More about पुरंदर जेनेरिक मेडिसीन स्टोअर

* जेनेरिक औषधे म्हणजे काय? *
जेनेरिक औषध म्हणजे मूळ औषध किंवा औषधाचे मूळ नाव. बाजारात असलेल्या विविध कंपन्या त्या औषधाला स्वत:चे ‘ब्रॅन्डनेम’ देऊन त्याची विक्री करतात. साहजिकच प्रत्येक कंपनीनुसार एकाच औषधाच्या दरात तफावत आढळते. बहुतांशी सर्वच रोगांवर जेनेरिक औषधे उपलब्ध आहेत.
* ब्रॅन्डेड औषधे घेण्याकडेच कल *
जेनेरिक औषधांची कुठेही जाहिरात केली जात नाही. परिणामी सामान्यांना त्या औषधांची नावे माहीत नसतात. याउलट ‘ब्रॅन्डेड’ कंपन्यांचे आहे. यांच्यापासून निर्मित औषधांची नावे कानावर सतत पडत असतात. त्यामुळे अनेकांचा कल ‘ब्रॅन्डेड’ कंपन्यांची औषधे घेण्याकडेच असतो.
जेनेरिक व ब्रॅन्डेड औषधांचे गुणधर्म एकच असतात. तरीही समान गुणधर्म असलेलीच, परंतु वेगळ्या कंपन्यांची औषधे घेतली तर आरोग्यावर परिणाम होईल असा विचार मनात डोकावतो, परिणामी खिशाला आर्थिक फटका बसतो.
‘ब्रॅन्डेड’ कंपन्यांच्या तुलनेत ‘जेनेरिक’ औषधे ३० ते ७० टक्के स्वस्त मिळतात. खर्चात बचत होण्याकरिता रुग्णांनी ‘फॅमिली डॉक्टर’शी सल्लामसलत करून जेनेरिक औषधे घेण्यास प्रारंभ केल्यास अनावश्यक खर्च वाचण्यास मदत होऊ शकते.
*किंमत कमी असण्याचे कारण*
प्रत्येक क्षेत्रात प्रचंड स्पर्धा आहे. ‘ब्रॅन्डेड’ कंपन्यांना करावी लागणारी जाहिरातबाजी, त्यावरील कर, व्यापारी आणि केमिस्ट यांना द्यावे लागणारे कमिशन, वाहतूक खर्च अशा विविध खर्चांचा बोजा अखेरीस रुग्णांवर पडतो. याउलट जेनेरिक औषधे यातील कित्येक खर्चांपासून मुक्त असल्यामुळे ती स्वस्त दरात उपलब्ध होतात.
बहुतांश रुग्णांचा विश्वास ‘फॅमिली डॉक्टरां’वरच असतो. साहजिकच त्यांनी लिहून दिलेली औषधे घेण्यालाच ते प्राधान्य देतात. परंतु औषध दुकानात ‘जेनेरिक’ हा प्रकार उपलब्ध असतो आणि ती औषधे खिशाला परवडतील अशा दरात उपलब्ध असतात. परंतु डॉक्टरांनी ती लिहून दिली असल्याने औषध विक्रेत्यांनी सांगूनही औषध घेण्यास नकार दिला जातो हे सर्रास पहावयास मिळते.
मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार हे केवळ श्रीमंतांचे आजार राहिलेले नाहीत. गरीब पेशंट तसेच ज्येष्ठ नागरिकांमध्ये या आजारांचे प्रमाण वाढलेले आहे. हे आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी महिन्याला दीड ते दोन हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र या आजारांना अर्ध्याहून कमी किंमतीतील जेनेरिक औषधांचा तेवढाच प्रभावी पर्याय उपलब्ध आहे.

Map of पुरंदर जेनेरिक मेडिसीन स्टोअर

OTHER PLACES NEAR पुरंदर जेनेरिक मेडिसीन स्टोअर