श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट

karla lonavala, dist mawal .pune, Pune, 410506
श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट is one of the popular Hindu Temple located in karla lonavala, dist mawal .pune ,Pune listed under Public places in Pune , Hindu Temple in Pune , Historical Place in Pune , Mountain in Pune ,

Contact Details & Working Hours

More about श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट

एकविरा आई.....!!!

नवसाला पावणारी , कोळ्यांचे आराध्य दैवत असणारी देवी म्हणून एकविरा देवीला हिंदू समाजात वेगळेच स्थान आहे. मंदिराचे वेगळेपण लेण्यांमध्ये असलेले तिचे स्थात , प्राचीनता आणि तिचं लोभसवाणं रूप यामुळे या देवीचे महत्त्व काही वेगळेच आहे. आई एकविरा मातेची कहाणी स्कंद्पुराण, महाभारत, गणेश पुराण, काली पुराण यांमधुन सांगितली गेली आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेगवेगळे संदर्भ मिळतात, म्हणुनच आ
ईचे चरित्र आभ्यासकंसाठी गुढ मानले जाते. भाविकांसाठी मात्र ती संकटात तारुन येणारी , नवसाला पावणारी आणि सदैव कृपेची सावली होऊन पाठराखण करणारी जगतमाउली आहे. आई म्हणजे माया, दया, क्षमा शांती यांचे स्थान आहे.

एकविरा देवीचा महिमा जसा आगळा तसंच तिचं स्थानही. कार्ल्याच्या लेणीमध्ये या देवीचे मंदिर असून देवळाच्या भोवती निसर्गही सिद्धहस्ते वंदन करत आहे. कार्ल्यामध्ये ह्या देवीचे मंदिर आहे. लोणावळयापासून ११ किमीवर ह्या देवीचे स्थान आहे. देवळाच्या सभोवती घनदाट झाडी , पांढरे शुभ्र धबधबे आणि थंडगार आनंदी वातावरण असे निसर्गाचे वरदान लाभले आहे. देवीच्या दर्शनासाठी डोंगर चढून जावे लागते. पण डोंगर चढताना दिसणारा इंदायणी नदीचा प्रवाह आणि विसापूर , लोहगड , तुंग असे गडकल्ले हा परिसर मोहून घेतात.

डोंगरातलं स्थान , प्रसन्न रूप , जागरूक देवस्थान आणि नवसाला पावणारी देवी म्हणून महत्त्व असलेल्या या देवीचं लोभसवाणं रूप प्रत्येक भक्तांने एकदा तरी डोळयात साठवून घ्यायला हवे.

चैत्र व अश्विन या महिन्यात देवीची मोठी यात्रा भरते. नवसाला पावणारी देवी म्हणून हे स्थान प्रसिध्द आहे. चैत्र व आश्विन या महिन्यात देवीची मोठी यात्रा भरते.

आई एकविरा कार्ला निवासीनी शक्तीदायीनी श्री एकविरा आई महाराष्ट्राची आराध्य कुलदैवता, हाकेला धावणारी नवसाला पावणारी आई एकविरा म्हणजेच आदिमाता रेणुका ही परशुरामाची माता होय. परशुरामाने आपल्या पराक्रमाने सर्वत्र किर्ती मिळवली, म्हणुन एका विर पुत्राची आई म्हणंजेच एकविरा माता होय. ‘एकवीरेति विख्याता सर्वकामप्रदायिनी सह्याद्रिखंडता असा उल्लेख सापडतो कि शंकरानेच आईला एकविरा हे नाव देउन ठेवले आहे. आई एकविरेचे स्थान कार्ला गडावर स्वयंभु असुन अतिशय प्राचीन आहे. आईची मुर्ती स्वयंभु तांदळा दगडात प्रगटलेली “शेन्दुंर चर्चीत” आहे. आईचे नेत्र मिन्यापासून बनवलेले आहेत. आईचे रुप प्रसन्नकारी आहे. एकविरा देवी ही जलदेवता म्हणुन प्रसिध्द आहे. आईच्या डाव्या हाताला आईची नणंद “जोगेश्वरी देवीची“ शेन्दुंर चर्चीत मुर्ती आहे. अश्विन व चैत्र महिन्यात देवीच्या उत्सावाच्या यात्रा होतात. कोळी, आगरी, कुणबी, सोनार, कायस्थ, पाठारेप्रभु, चौकळशी, पाचकळशी, क्षात्रीय, वैश्य इ. समाजाची आई एकविरा कुलस्वामीनी आहे. त्यामुळे ठाणे, मुबई, रायगड व पुणे येथील लोकांची वर्षभर गर्दी असते. विशेषकरून कोळी व आगरी समाजातील लोक वर्षभर आईच्या दर्शनासाठी येतात. जगभरातुन भाविक आईच्या दर्शनाला येतात. दिवसेंदिवस एकविरेच्या भक्तांमध्ये वाढ होत आहे. आईच्या मंदिरा शेजारी “ प्राचीन बौध्द इतिहासप्रसिध्द कार्ला लेणी“ आहेत. येथील शिल्प चैत्यगृह, बौध्दशिल्पे, सिंहस्तंभादी शिल्पे, मुख्य गुंफा, सभा मंडप, उत्तुंग सिंहस्तंभ, स्तंभावरील शिल्पे, काष्ठकाम, भित्तीचित्रे, शिलालेखांसाठी या लेणी जगप्रसिध्द आहेत. त्यामुळे येथे वर्षभर पर्यटक लेणी पाहण्यासाठी आईच्या दर्शनासाठी व येथील नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी आवर्जून येतात. इंद्रायणी नदी, विसापूर, लोहगड, तुगं हे नयनरम्य गड किल्ले कार्ला गडावर चढताना दृष्टीस पडतात. श्री एकविरा देवी विश्वस्त संस्थानच्या वतीने प्राथमिक सेवासुविधा पुरवित गडावर अनेक सुधारणा केल्या आहेत. संस्थेचे अध्यक्ष श्री. अनंत तरे यांच्या अथक प्रयत्नांनी येणाऱ्या भाविकांना पिण्याच्या पाण्याची, विजेची, राहण्याची, रस्त्यांची, प्रसादाची व दर्शनाची योग्य काळजी घेतली जाते. गडावर लवकरच रोप-वेची सुविधा ही सुरू होणार आहे. आई एकविरेच्या भक्तांसाठी सदैव तत्पर असलेले श्री एकविरा देवी विश्वस्त संस्था प्रामाणिकपणे आईची सेवा समजून अहोरात्र भक्तांसाठी काम करत असते. संस्थेच्या वतीने गडावर यात्रा, पालखी, होमहवन, जागरण, गोंधळ, भजन, किर्तन, व्याख्याने असे विविध कार्यक्रम वर्षभर आयोजित केले जातात. आईच्या जगभरातील भाविकांसाठी विश्वदर्शन आईची वेबसाईट बनवली आहे. त्यामुळे आईचे दर्शन अर्थात विश्वदर्शन झाले आहे. जगातून कुठूनही आईचं दर्शन घेणं आता सोप्प झालं आहे. आई एकविरेच्या सर्व भक्तांना उदंड आयुष्य लाभो हीच एकविरेचरणी प्रार्थना! सदानंदाचा उदो उदो! आदिमाउलीचा उदो उदो!! आई एकविरेचा उदो उदो!! जय एकविरा आख्यायिका एकविरेति विख्याता सर्वकामप्रदायिनी| अदितीर्यामदंबा सा संभविष्याति भूतले || जनिष्यामि संदेह: पंचपुत्रान्मनोरथान् | सह्यद्रीखंडात एकविरा देवीबद्दल असा उल्लेख आढळतो. आदितिने तपकेल्यावर शंकरानी तिला वर दिला की तुझा भूतलावर अवतार ईक्षाकू वंशातील घरी होईल. त्यावेळी तूझे मूळ नाव “रेणूका” असेल परंतु भूतलावर मात्र तू “एकविरा” या नावाने विख्यात होशील, तसेच तुला पाच पुत्र होतील म्हणुन या श्लोकाआधारे असे म्हणता येईल की, या देवीला एकविरा हे नाव साक्षात शंकरानीच ठेवले असावे, तसेच कदाचित एका वीर पुत्राची आई म्हणुनही एकविरा असे नाव ठेवण्यात आले असावे, आई एकविरेच्या नावाबद्दल दुसरी एक अख्यायिका अशी आहे – द्राविडीयन लोकांची रेणूका ही अतिप्रिय देवता असून तिचे नाव “अक्का अत्वैचर” असे आहे या शब्दाचा ते “पूजनीय” माता असा अर्थ करतात. तेव्हा या नावापासून ही “एकविरा” हा अपभ्रंश संभवतो तसेच (कर्नाटकात रेणूकेची पूजा “यल्लमा” किंवा “यमाई” या ही नावाने होते ) दक्षिण प्रांती या देवतेला आतिशय महत्व आहे, भारतात तसेच कर्नाटक या दोन्ही प्रदेशात एकविरेची पूजा सर्वत्र केली जाते, पुराणांच्या आधारे विष्णुने पृथ्वी तलावर १० अवतार घेतले १) मत्स्य, २) कुर्म, ३) वराह, ४) नरसिंह, ५) वामन, ६) परशुराम, ७) राम, ८) कृष्ण, ९) बुध्द व १०) काली. एकविरा देवी परशुरामाची आई रेणूका. परशुरामाचा अवतार सहावा. त्याच्या कालखंडात त्याने सह्याद्री पर्वतात दिव्य बाण मारून एकवीरा देविची स्थापना केली आणि जी बौध्द लेणी भगवान बुध्दांच्या पुण्य प्रभावातून निर्माण झाली तो बौध्द अवतार अर्थात विष्णूचा अवतार ९ वा आहे. यावरून एकविरा स्थान व कार्ला लेणी यात राम व कृष्णा या दोन विष्णू अवतारांचा फरक आहे. म्हणजे कार्ला येथील बौध्द लेण्यापेक्षा कार्ला येथील एकविरा देवीचे स्वयंभू स्थान हे प्राचीन आहे. आई एकविरा संत एकनाथांची कुलदेवता होती “श्रेष्ठ खाणी कुलदेवता, जे का एकविरा एकनाथा| जगी मीरवली एकात्मता | हे कुलदेवता एकनाथाची”|| (एकनाथी भागवताच्या आरंभी १.७०-७३ ओव्यांत कुलदेवतेस संत एकनाथांनी नमन केले आहे) ते शिवशक्तिरूपे दोनी | नेऊन मिरवे एकपणी। एकपणे जाली गुर्विणी | प्रसवे एकपणी एकविरा।। ते एकरूपे एकविरा | प्रसवली बोध फरशधरा। जयाचा का दरारा | महावीरां अभिमानियां।। तेणे उपजोनि निवटिली माया| आज्ञा पाळूनि सूख दे पितया || म्हणोनी जो जाहला विजया| लवलाह्यां दिग्मंडळी जो वासना सहस्त्रबाहो |छेदिला सहस्त्रार्जुन अंहभावी| स्वराज्य करूनियां पाहा हो |अर्पी स्वयमेवो स्वजातियां|| (एकनाथी भागवत १.७०-७३) एकविरा आईचे थोर भक्त विष्णुदास यांनी माझी रेणूका माउली, कल्पवृक्षांची सावली या शब्दात एकविरेचे वर्णन केले आहे, आईएकविरेची अख्यायिका सागांयची झाली तर आईची मूर्ती ही स्वयंभू (तांदळा) दगडात प्रगटलेली शेन्दूंर चर्चीत आहे एकविरा देवी ही जलदेवता म्हणून प्रसिध्द आहे. जलदेवता म्हणजे ज्या लोकांचा पाण्याशी जास्त संबध येतो. कोळी, आगरी या लोकांना आईची नेहमीच प्रचिती येते कारण ह्या लोकांचा व्यावसाय हा पूर्णपणे पाण्याशी संबधीत आहे. म्हणूनच कोळी आगरी व कुणबी, सोनार, पाठारेप्रभू, चांद्रसेनिस कायस्त प्रभु, चौकळशी-पाचकळशी प्रभु या समाजात ही आईची प्रचीती भक्तानां वारंवार येते, त्यामूळेच या समाजाने आईएकविरेला कुलदैवत मानलं आहे. आई एकवीरा क्षत्रीय, वैश्य, शुद्र समाजाची कुलदैवता असल्याकारणाने ती अति प्राचीन देवता असावी असा इतिहास संशोधकांचे मत आहे. ज्या वेळी देवता दुष्टांचा नाश करते, त्या वेळी नीश निर्देशक म्हणून ती मूर्ती काळ्या पाषाणाची घडवतात. परंतु जेव्हा एखादी देवता भक्तांच्या संरक्षणासाठी, पालनासाठी वा शुभकार्य करते, तेव्हा ती मूर्ती शुभ्र पाषाणाची घडवतात. एकविरा आईची मीर्ती (तांदळा) दगडावर कोरलेली असून शेंदूर चर्चीत आहे. आईचे नेत्र हे मिन्यापासून बनवले आहेत, आईचा चेहरा प्रसन्नकारी आहे, सकाळी आईचा अभिषेक झाल्यावर आईला सुवर्ण मुखवटा चढवला जातो. आईला चोळी, पातळ नेसवून आईचे सर्व दागिणे आईला घातले जातात. आईच्या नाकातली नथ खूपच उढावदार वाटते. त्यामुळे आईचे ते रूप अतिशय प्रसन्नकारी वाटते. आईच्या डाव्या हाताला आईची नणंद जोगेश्र्वरी देवीची शेंदुरचर्चित मूर्ती आहे. जग भरातून रोज लाखो भक्त आईच्या दर्शनाला येतात. नवसाला पावणारी आई आशी भक्तांची श्रध्दा आहे. त्यामूळे नवस करणाऱ्यांची व नवस फेडणाऱ्यांची इथे रोजच गर्दी असते. नवस करणारे लोक दागिणे, मुखवटा, देणगी, ओटी, अन्नदान किंवा इतर प्रकारे आपला नवस आपापल्या परीने फेडतात. इथे देवीला कोंबडा किवा बकरा बळी देण्याची प्रथा आहे. आईचा कुंकू मंदीराच्या बाहेर कोंबडी-बकऱ्यांना लावून डोगराच्या पायथ्याशी त्यांचा बळी दिला जातो. महत्वाचं म्हणजे येथे देवीला प्रदक्षिणा घालता येत नाही कारण आईची मूर्ती डोंगरात खोदलेली आहे. सुट्टीच्या दिवसात गडावर आईचे दर्शन घेण्यासाठी भाविक खुप मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.

चैत्र महिन्यातील यात्रा
------------------------------
चैत्र महिन्यात पौणिमेस चित्रा नक्षत्र चंद्राजवळ येते. चैत्र शुध्द सप्तमीस प्रारंभ झालेली भव्य जत्रा पोर्णिमेपर्यंत चालते. चैत्र शुध्द षष्ठी आणि सप्तमी. एकविरेच्या मंदिरात चैत्र नवरात्र उत्सव तीन दिवस खुप मोठ्या उत्सवात पार पडतो. कार्ला गडावर आईची यात्रा आईचा उत्सव पूर्वीपासून चालत आलेल्या प्रथा परंपरेप्रमाणेच आज हि तितक्याच श्रध्देने भक्ती-भावाने साजरा केला जातो. ट्रस्टच्या वतीने मंदिरात तीन दिवस धार्मिक कार्यक्रम राबिवले जातात. आईचे दर्शन घेण्यासाठी भक्तगण देश–परदेशातून तीन दिवस कार्ला गडावर येतात. तीन दिवस साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात प्रत्येक दिवसाचे वेगळे महत्व आहे.

चैत्र शुध्द षष्ठी
----------------------------------
चैत्र महिन्यात भरणारी यात्रा मोठी असते. चैत्र शुध्द षष्ठीस प्रारंभ झालेली ही यात्रा पौर्णिमेपर्यंत असते. एकविरा देवीच्या यात्रेचा समारंभ तीन दिवस साजरा करण्यात येतो. श्री एकविरा आईचा भाऊ भैरवनाथ निवास करत असलेल्या म्हणजेच एकविरा आईचं माहेर समजल्या जाणाऱ्या ‘देवघर ‘ (माहेरघर) या गावात भाविक मोठ्या संख्येने भैरवनाथाच्या पालखीसाठी सज्ज होतात. भैरवनाथाचा मानकरी पाटील व पुजारी हे देवीचा कौल घेवून पालखीसाठी परवानगी मिळवतात. कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी सर्व भक्तांच्यावतीने आराधना करतात आणि पालखीला सुरुवात होते. देवळासमोरच असलेल्या तलावाभोवती फेऱ्या घालून पालखी नाचवली जाते. भक्तगण आईच्या व भैरवनाथाच्या जयघोषात स्वत:ला विसरून जातात. एकविरा आईच्या आणि भैरवनाथाच्या गजरात गुलाल उधळत भक्तीमय वातावरणात या सगळ्यांचा अनुभव घेत मध्यरात्रीपर्यंत पालखी नाचवली जाते. त्यानंतर पालखी पुन्हा देवळात स्थानापन्न होते. षष्ठीस निघणाऱ्या या भैरवनाथाच्या पालखीस एकविरा आईच्या पालखी इतकेच महत्व आहे. जुने जाणते आईचे भाविक प्रथम भैरवनाचे दर्शन घेऊनच नंतर आई एकविरेच्या दर्शनाला कार्ला गडावर येतात.
चैत्र शुध्द सप्तमी
----------------------------
चैत्र शुध्द सप्तमीस संध्याकाळी श्री एकविरा आईची पालखी काढण्याच्यी तयारी सुरू होते. आई एकविरेच्या पालखी निमिताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक पालखीत सामील होण्यासाठी आप-आपल्या गावातून पालख्या घेऊन मोठ्या संख्येने कार्ल्याला येतात. शेकडो मैलाचा पाई प्रवास करीत भाविक आईच्या पालखीत सामील होण्यासाठी आईच्या आठवणीने कार्लाच्या दिशेने येतात. कसलीही परवा न करता आईचे नामस्मरण करीत, आनंदात उत्साहात, ढोल-ताशांच्या गजरात, गुलाल उधळीत, वाजत-गाजत-नाचत गडावर येऊन आईच्या पालखीत सामील होतात. पालखीच्या दर्शनासाठी जगभरातून लाखोच्यां संख्येने भाविक कार्ल्याला येतात. फुलांनी सजविलेल्या पालखीत देवीचा मुखवटा ठेवून पालखी वाजत गाजत निघते. मानकरी भावीक देवीचे भोई होतात. आतषबाजी. गुलाल आईच्या जयजयकाराच्या जल्लोषात देवीची पालखी प्रवेशव्दार ओलांडून पायऱ्या ऊतरू लागते आणि पायथ्याशी वेहेरे गावात येते. प्रवेशव्दारापासून लेण्यांच्या प्रवेशव्दारापर्यंत वाजत गाजत मिरवणाऱ्या पालखीच्या जल्लोषात भक्त आईच्या पायाशी एकरूप होतात. वेहेरेगावाभोवती फेरी मारून परत पालखी पायऱ्या चढुन कार्ला गडावर आणतात आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणात भाविक आईच्या तेजोमय रूपाचे दर्शन घेऊन गडावरच थांबतात. चैत्र शुध्द सप्तमीच्या रात्री पालखी सोहळा संपन्न झाल्यावर जमलेले भक्तगण थकवा घालवण्यासाठी मंदीर परिसरातच आपलं थांड मांडतात. आत मंदीरात जवळ जवळ पहाटेच्या ४ च्या सुमारास आईच्या “तेलवण्याच्या“ व “मानाच्या“ विधीला सुरुवात होते. कार्यक्रमाला चौल आग्रवाचे “आग्रावकर“ आणि पेणचे “वालाकर“ या मानकऱ्यांच्या हस्ते तेलवण्याचा व मानाचा विधी पार पडतो. प्रथम आईची नणंद जोगेश्वरी आईचा अभिषेक केला जातो. नंतर एकविरा आईचा तेलाने अभिषेक केला जातो. यास तेलवणे असे म्हणतात. या दिवशी तेलवण्याच्या विधीला विशेष महत्व आहे. आईचा आभिषेक सुरू असताना गाभाऱ्यात बसुन कोळी महिला आई एकविरेची पारंपारिक गाणी बोलतात आणि त्याप्रमाणे आईचा विधी केले जातात. देवीचे ओटी भरतात देवीला आरती करतात. कोळी महिलांच्या पारंपारिक गाण्याने मंदीरात भक्तिमय वातावरण निर्माण होते. अभिषेक पुर्ण झाल्यावर आईला सजवले जाते नंतर आईची घंटा, टाळ, मृदुंग, ढोलकी व चौघड्यांच्या जल्लोषात आईची आरती केली जाते. त्या नंतर आलेले भाविक आईचं दर्शन घेतात.
चैत्र शुध्द अष्टमी
--------------------------------------
अष्टमीचा दिवस मानाचा बलिदानाचा दिवस होय. या दिवशी भक्त नवस पुर्ण करण्यासाठी येथे जमतात. नवसात ठरल्याप्रमाणे कोंबडा, बोकड किंवा मेंढा यांपैकी बळी दिला जातो. देवीला प्रसाद म्हणून तीरापणी देवीसमोर ठेवली जाते. (तीरापणी) कोंबडा, बकरा किंवा मेंढ्याची काळजी भाजून विड्यावर ठेवून देवीला प्रसाद दाखवला जातो. त्याच दिवशी किंवा दुस-या दिवशी लहान मुलांचे जावळ (केस काढणे) केले जातात. मुल होण्यासाठी भाविक नवस बोलतात नवस पुर्ण झाल्याकारणाने लहान मुलांचे जावळ इथे केला जातो. लहान मुलाला वाजत गाजत आईच्या दर्शनाला आणतात त्याच्या गळ्यात हार व कपाळावर आईचा कुंकु लावतात. मंदिराच्या शेजारी बायांचे स्थान आहे तेथे त्या मुलाला दर्शन देतात. नंतर मंदिराच्या बाहेर त्याचे केस काढतात व काढलेले केस गडाच्या मागच्या बाजूस विहीरीत विसर्जन करतात अश्या पध्दतीने आई एकविरेची चैत्र यात्रा सोहळा संपंन्न होतो.
काठीची यात्रा
----------------------------------------
चैत्रातील यात्रेनंतर आठ दिवसानी पौर्णिमेच्या दिवशी कार्ल्यास भरण्याऱ्या यात्रेस ‘काठीची यात्रा’ म्हणतात. देवीचे माहेरघर असलेल्या देवघर या गावातून देवीची काठी वाजत-गाजत कार्ला गडावर आणली जाते. या यात्रेला स्थानिक आणि परिसरातील गावांतील भक्त आवर्जून उपस्थित राहतात. आईच्या मंदीरासमोर काठी उभी करून सर्व भाविक आई एकविरेचे दर्शन घेतात.
--------------------------------------------------------------------------------------------------

श्री एकविरा आई मंदिरात अश्विन शुध्द प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्री उत्सव चालतो. पृथ्वीची प्रतीकात्मक पूजा म्हणून घटस्थापना केली जाते. नऊ प्रकारची धान्य पेरून उगवली जातात. सृष्टीच्या सृजन शक्तीची पूजा केली जाते. नवरात्र उत्सवातील प्रत्येक दिवसाचे एक महत्व आहे. ट्रस्टच्या माध्यमातून नऊ दिवस मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रम घेण्यात येतात. दुर्गा स्तोत्र पठण, भजन, जागरण, किर्तन, प्रवचन, शिबीर, आईचा अभिषेक व इतर या दरम्यान यात्रेच्या निमित्ताने अनेक राजकिय नेते, सामाजिक नेते, कलाकार आईच्या दर्शनासाठी न चुकता कार्ला गडावर येतात. मंदिरात नऊ दिवस चौघडा झडतो, नगारा वाजविला जातो. घंटा नादाच्या तालावर पंचारती होते. नवमीच्या मध्यरात्री होम हवन होते. या होमाला ‘नवचंडी होम’ म्हणतात. या होमाला विशेष महत्व आहे. होमाचे दर्शन घेण्यासाठी लाखोच्या संख्येने लोक गडावर येतात. आईचं दर्शन घेऊन नंतर रांगेत उभ राहुन होमाचे दर्शन घेऊनं होमातील राख कपाळी लावून होमात नारळ, कोल्हा (भोपळा), लाकुड, कारवी, फळं, अगरबत्ती, कापूर, लिंबू अर्पण करतात. होम सुरू असतानाच पहाटे शेवटी बोकडं बळी दिला जातो. त्याच्या (काळजीची) तिरापणि करून सर्व भक्तांना त्याचा प्रसाद वाटला जातो.
दशमीच्या शुभमुहुर्तावर दसरा सण भक्त मोठ्या भक्तिभावाने साजरा करतात. मंदिरात झेंडू व आंब्याच्या पानांची तोरणं बनवून पुर्ण मंदिराभोवती लावतात. देवीच्या चरणी आपट्याची पाने, झेंडूची फुलं वाहुन सर्व भक्तगण सोनं लुटतात. दसऱ्याच्या निमित्ताने भक्त दानधर्म करतात.
------------------------------------------------------------------------------------------------
" आय मावलीचा उदो उदो ....!

माझ्या एकविरा आईचा उदो उदो......!

एकविरा माते कि जय..........!

Map of श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट