Bhimashankar Mandir

Bhimashankar, Pune,
Bhimashankar Mandir Bhimashankar Mandir is one of the popular Hindu Temple located in Bhimashankar ,Pune listed under Public places in Pune , Historical Place in Pune ,

Contact Details & Working Hours

More about Bhimashankar Mandir

भीमाशंकर -
देशातील बारा लिंगा पैकी सहावे ज्योतिलिंग भिमाशंकर आहे. मंचरच्या पश्चिमेला ६५ किलोमिटर अतंरावर डोंगरदरीत व दाट झाडीत प्राचीन काळातील भीमाशंकर मंदिर आहे. सह्याद्री पश्चिमेकडे पसरलेल्या एका उंच डोंगरावर आहे. या डोंगराला च भीमाशंकर डोंगर हे नाव आहे.भीमाशंकर शिखराची उंची समुद्रसपाटीपासून ३४५४ फुट म्हणजे सुमारे पाउण मैल आहे. भीमाशंकर मंदिर १२०० ते १४०० वर्षांपूर्वीचे असून त्याचे बांधकाम हेमाडपंथी पद्धतीचे आहे. मंदिराच्या छतावर आणि खांबावर अतिशय सुंदर नक्षीकाम आढळते. मंदिरावर दशावताराच्या कोरलेल्या मुर्ती रेखीवा व सुंदर आहेत.देवळा जवळ दगडी नंदी बसविलेला आहे. तेथेच पाच मण वजनाची टांगलेली लोखंडी घंटा आहे. १७२९ अशी नोंद घंटेवर आहे. मंदिराच्या आवारात मोक्षकुंड आहे.
मंदिराच्या नैऋत्य दिशेला एक किलोमिटर अंतरावर हनुमान तळे आहे. तळयापासून पुढे उंच तुटलेला कडा आहे या कड्याला आकार नागाच्या फणी सारखा आहे.याला नागफणी असे म्हणतात पूर्वी त्रिपुरासूर नावाच्या दैत्याने या भागात फारच धुमाकूळ घातला होता त्याचा नाश करावयासाठी श्री शंकरांनी प्रचंड असे भीमरूप धारण केले. अनेक दिवस त्रीपारी सुराशी युध्द केले. वध श्री शंकरा ने केला.शंकर घामाघूम होऊन येथील शिखरावर बसले.अंगातून घाम निघणा ऱ्या घामाचा धारातून ही भीमा नदी एथून उत्पन्न झाली अशी कथा आहे. रायगड ठाणे पुणे या तीन जिल्हाम्च्या सरहद्दीवर हे ठिकाण आहे.

पंढरपूरला चंद्रभागा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नदीचे नाव भीमा आहे. या भीमा नदीचा उगम याच भीमाशंकराच्या डोंगरावर आहे.
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे- आसनगावमाग्रे माहुली गावातून शिडीच्या वाटेने किल्ल्यावर आल्यावर समोरच पाण्याची दोन टाकी आहेत. पाच मिनिटांवर आणखी एक पाण्याचे टाके आहे. उजवीकडे गेल्यावर खाली पहारेकऱ्यांच्या देवडय़ा आहेत. समोरच ढासळलेल्या अवस्थेतला महादरवाजा आहे. इथून भातसा राशी, अलंग, मदन, कुलंग व कळसूबाई पर्वतरांग दिसते. तर पूर्वेला हरिश्चंद्रगड, आजोबा, दक्षिणपूर्वेला माथेरान रांग, दक्षिणपश्चिमेला तानसा खोरे, तुंगारेश्वर रांग असलेला प्रचंड मुलूख दिसतो. शिडीच्या वाटेने दोन मिनिटे पुढे गेल्यावर डावीकडे जंगलात एक वाट जाते. वाटेतच छप्परवजा असणारे महादेवाचे मंदिर आहे. पुढे वाडय़ाचे काही अवशेष आढळतात. समोरच पाण्याचा फार मोठा तलाव आहे. पुढे गेल्यावर जांभळाचे रान लागते. ही वाट िखडीत जाऊन पोहोचते. ही िखड म्हणजे माहुली आणि भंडारगड दरम्यानची िखड आहे. िखडीच्या थोडे वर गेल्यावर उजव्या बाजूस ५०० ते ६०० फूट खाली उतरल्यावर कडय़ालगतच कल्याण दरवाजा आहे. या दरवाज्यातून गडावर यायचे झाल्यास प्रस्तरारोहणाची गरज पडते. िखडीतून वाटेने वर चढत गेल्यावर झाडीमध्ये बारमही पाण्याचं भुयारी टाके आहे. येथून पुढे जाणारी वाट गडाच्या दक्षिण टोकापाशी म्हणजेच भंडारगडावर घेऊन जाते.
निळ्या, गुलाबी, पाऱ्या रानफुलांची येथे विमुक्त झालेली पखरण, ऑर्किडचे पाहायला मिळणारे विविध प्रकार, निरम वेलींची विविधता आणि महाराष्ट्राचं मानचिन्ह असलेल्या ‘शेकरू’ खारीचं दर्शन ही आगळी अनुभूती भीमाशंकर भेटीत अनुभवायला मिळते. रानमांजर, रानउंदर, साळींदर, मुंगूस हे दृष्टीस पडणारे प्राणी, अनपेक्षितपणे एखाद्या वेळी दर्शन देणारा बिबटय़ा, पायाजवळून नकळत सरपटून गेलेला साप अंगावर शहारे आणतो. आसपासच्या झुडपातून रानडुकरांची झुंड खसपटत जाते. उत्सुकता



आणि भयाणता या दोन्ही गोष्टी अनुभवण्यासाठी चांदण्या रात्रीतली अभयारण्यातली सफर फारच रोमांचकारी ठरते.

खरं तर वनसंपदा संरक्षित करण्यासाठी १० ऑक्टोबर १९८५ पासून भीमाशंकर परिसर अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला. त्यापूर्वी भीमाशंकर निसर्गनिर्मित देवराई होती. अनेक प्रकारची दुर्मिळ वृक्षराजी येथे असून नागदेवतेचं शिल्पही आहे. निसर्गदेवतेची क्षमा मागितल्याशिवाय कोणत्याही झाडाची तोड येथे करता येत नाही अथवा प्राणी मारता येत नाही, ते ठिकाण म्हणजे देवराई. त्यातच ज्योतिर्लिग भीमाशंकरच्या रूपात येथे असलेलं शिवमंदिर यामुळे धार्मिकतेचा वारसाही या परिसराला लाभलाय.
महाराष्ट्रातून वाहणाऱ्या प्रमुख नद्यांपैकी भीमा नदीचा उगम येथील ‘डाकिणीचे’ वन या भागात होतो. पावसाळ्यात उंच खडकावरून कोसळणारा येथील धबधबा अतिशय सुंदर दिसतो. अनेक प्रकारचे पक्षी या अभयारण्यात आढळतात. पहाटेच्या जंगल वास्तव्यातून कुजन करणारे तांबट पक्षी, जंगली कबुतरे, दयाळ, कोतवाल, कोकीळ हे पक्षी येणाऱ्या पाहुण्या
निसर्गप्रेमींना यजमान या नात्याने मंत्रमुग्ध करतात.
रात्रीच्या काळोखाची भयाणता वाढविणारे, रातवा घुबड, इतर पक्ष्यांमध्ये पोपट, सुतारपक्षी, मोर, खाटीक, चंडोल, रानकोंबडय़ा, धनेश हे पक्षीही येथे पाहायला मिळतात.

बाराही महिने येथे आल्हाददायक हवामान असल्याने प्रत्येक ऋतूतील वातावरण निसर्गप्रेमी, भाविक पर्यटकांना सुखावणारे असते. चैत्रामध्ये कडुनिंबाचा बहर सर्वत्र बरसत असतो. जसजसा चैत्र संपत येतो तसा वैशाख वणव्याची चाहूल देणारा कांगारा लाल फुलांच्या ज्वाळा भासवत फुललेला असतो. समृद्ध वनश्री आणि सदाहरित वृक्षांमुळे उन्हाळ्यातदेखील तापमान थंड असते, त्यामुळे अभयारण्यात प्रवेश करताना थंडावा जाणवायला लागतो.
भीमाशंकर म्हणजे निसर्गाचं अनुपम, नयनरम्य, मनोहारी सौंदर्यस्थान. अनेक प्रकारच्या वेली, फुलझाडे, औषधी वनस्पती येथे विपुल प्रमाणात दिसतात. त्यामध्ये द्राक्ष आणि टोमॅटो बागेच्या बांधणीस उपयुक्त ठरणारी कारवी, औषधे व साबण उत्पादनात वापरली जाणारी शिकेकाई, रिठा, रानजाई, रानतुळस, तमालवृक्ष, निवडुंग अशा प्रकारची बहुपयोगी झाडे तसेच आंबा, उंबर, हिरडा, बेहडा, काटेसावर, करंज, घावडा, शिसम, शेंदरी, आपटा, आवळा हे मोठे वृक्ष येथे आढळतात. येथील पर्वतराजीत मिळणारी काळी मैना (करवंदे), ऐन वैशाखात गाभुळते जांभूळ वृक्षांना जांभळे लगडतात.

तद्वतच डोंगरी भागात राहणारे आदिवासी, कातकरी, ठाकर जमातींना उत्पन्नाचं साधन उपलब्ध होते. जांभूळ, करवंदे त्याचप्रमाणे मध, डिंक गोळा करून ते विकतात. भात व नाचणीचे पीक घेऊन मासेमारी, खेकडे पकडून महादेव कोळी जमातीचे लोक उत्पन्न मिळवतात. भीमाशंकरचं प्रतीक म्हणून वैशिष्टय़पूर्ण असलेला दुर्मिळ प्राणी म्हणजे ‘शेकरू’ ही वैशिष्टय़पूर्ण प्रजाती असलेली खार भारतात इतरत्र आढळत नाही, म्हणून या प्राण्याला महाराष्ट्राचे मानचिन्ह म्हणून महत्त्व प्राप्त झाले आहे.
भीमाशंकरला अतिप्राचीन काळापासून असलेले स्वयंभू मंदिर हेमाडपंती कलाकुसरीचे आहे. त्रिपुरी पौर्णिमेला त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा संहार शंकराने केला म्हणून त्रिपुरी पौर्णिमेस इथे भक्तांचा मोठा मेळा भरतो. प्रतिवर्षी श्रावणी सोमवारी, सोमवती अमावास्येला, महाशिवरात्रीला शिवभक्तांची अलोट यात्रा भरते. मंदिराचा भव्य सभामंडप, उंच कळस अतुलनीय कलाकुसर आहे. या ठिकाणी चिमाजी अप्पांनी भेट दिलेली भव्य घंटा वेगळेपण म्हणून आजही पाहायला मिळते.
भीमाशंकरला भेट देण्यासाठी पुणे-मंचर- घोडेगावमार्गे तसेच मुंबई-भीमाशंकर, कल्याणमार्गे येता येते. एसटी महामंडळाच्या बसेसचीदेखील व्यवस्था आहे. निवासासाठी वन खात्याचं विश्रामगृह उंच टेकडीवर आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचं पर्यटक केंद्र या ठिकाणी असून स्थानिक धर्मशाळांमध्येही राहण्याची व्यवस्था होऊ शकते.
येथील शिवालयाचा जीर्णोद्धार करण्यासाठी तसेच या पवित्र जागृत तीर्थक्षेत्री येणाऱ्या भाविकांसाठी अधिक सोयी उपलब्ध करून देण्यासाठी वित्तमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या प्रयत्नातून भीमाशंकर विकास आराखडा बनविण्यात आला आहे. भीमाशंकर जीर्णोद्धार समिती येथील मंदिर परिसर विकासासाठी १९६४ पासून कार्यरत आहे.

Map of Bhimashankar Mandir