फेसबुक|सातारा

Satara, 415001
फेसबुक|सातारा फेसबुक|सातारा is one of the popular Landmark & Historical Place located in ,Satara listed under Tours/sightseeing in Satara , Landmark in Satara , Historical Place in Satara , Tourist Information in Satara ,

Contact Details & Working Hours

More about फेसबुक|सातारा

">SATARA
हा मला गर्व आहे
की मी सातारा या महाराष्ट्रा मधील
सुंदर ठिकाणी जन्माला आलो,
आणि तुम्हाला देखील सातारकर
असल्याचा अभिमान आसेल तर या आपण
या मेळाव्यात एकत्र
येउया आणी सातारा चे नाव अभिमानाने
घेउया.
या सातारा मध्ये
छत्रपति शिवाजी राजे यांचे
वंशज अजुनही आहेत तसेच सातारा येथे
सज्जनगडला श्री रामदास स्वामी
यांच्या पादुका आहेत
त्यांची पूजा अजूनही लोक करतात.
सातारला सज्जनगड, अजिंक्यतारा,
साखर कारखाने तसेच
कोयना धरना सारखे अनेक ठिकाने
प्रसिद्ध आहेत.
सातारचे लोक अतिशय प्रेमळ तसेच सुन्दर
स्वभावाचे आहेत हे मी नव्हे तर संपूर्ण
महाराष्ट्राचे लोक म्हणतात, हे खरे आहे
पण प्रेमळ स्वभावा बरोबर धर्यशील,
हिम्मतदार आहेत याचाच मला अभिमान
आहे.
या साताऱ्यामध्ये महाबळेश्वर, पाचगणी, कास, ठोसेघर धबधबा तसेच
येवतेश्वर सारखी प्रेक्षणीय स्थळे आहेत,
शिवरायांच्या वारस
आजुनही या सातारा मधे आहे हे
या जगाला दाखवा.
सातारकर
मित्रानो आपल्याला सातारकर
असल्याचा अभिमान असल्यामुळेच आम्ही "फेसबुक|सातारा" नविन
पेज काढले आहे.
"फेसबुक|सातारा" परिवारामध्ये आपले सहर्ष
स्वागत आहे.

♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪

सातारा - सातारा हा महाराष्ट्रातील काही मोठ्ल्या जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. सातारा जिल्हा हा प्रामुख्याने त्याच्या हिल स्टेशन्स (महाबळेश्वर, पाचगणी आणि किल्ले) साठी प्रसिद्ध आहे. संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर सातारा हे बऱ्याच काळाकरिता मराठ्यांच्या राजधानीचे ठिकाण होते. पश्चिम महाराष्ट्राच्या मध्यभागी वसलेल्या साताऱ्याचा संबंध पुणे, सांगली, मिरज आणि कोल्हापूरशी येतो. सातारचे कंदी पेढे महाराष्ट्रच काय तर संपूर्ण देशभर मोठ्या चवीने खाल्ले जातात. कृष्णा आणि कोयना नदीच्या काठावर वसलेल्या सातारची अजून एक शान म्हणजे येथील मिलिटरी स्कूल (सैनिक स्कूल).
किल्ले अजिंक्यतारा सातारच्या इतिहासाची साक्ष देत उभा आहे. शहरामध्येच स्थित असलेला अजिंक्यतारा शहराच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून दिसून येतो. समुद्रसपाटीपासून ३३०० फूट उंचीवर असलेल्या अजिंक्यता-यावरून सातारा शहराचे अतिशय विहंगम दृश्य पहावयास मिळते. अजिंक्यता-याचे खरे सौंदर्य येव्तेश्वर च्या डोंगरावरून पहावालास मिळते.
असे ऐकायला मिळते कि सातारा शहराभोवती असलेल्या सात गडांमुले याला सातारा नाव पडले (सात + तारा = सातारा ). ते सात तारे म्हणजे १.अजिंक्यतारा ,२.सज्जनगड , ३.यवतेश्वर, ४.जरंडेश्वर, ५.नाकडीचा डोंगर, ६.किटलीचा डोंगर, ७. पेढ्याचा भैरोबा.
११ तालुक्यांचा मिळून सातारा जिल्हा बनला आहे. १. सातारा, २.जावळी, ३.कोरेगाव, ४.महाबळेश्वर, ५.वाई, ६.खंडाळा, ७.फलटण, ८.माण, ९.खटाव, १०.कराड, ११. पाटण.

♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪

शिवरायांच्या पद स्पर्श्याने पावन
झालेली भूमी सातारा,
सात गडांच्या कुशीत वसलेला सातारा,
सज्जनगडाचा इतिहास सातारा,
प्रतापगडाचा धुंद वारस सातारा,
अजिंक्यतारा सातारा,
शिवाजी राजेंचा मर्द मराठा सातारा,
कृष्णा कोयनेच्या संगमाची साक्ष
देणारा सातारा,
धोतरापासून फेट्या पर्यंत मातीचा अस्सल
सुगंध सातारा,
झुणका भाकरीचे जेवण सातारा,
कंधी पेढाचा गोडवा सातारा,
गावरान शिव्यांमध्ये रंगणारे प्रेम सातारा,
"काय भावा" शब्दातील प्रेम बन्दुभाव
सातारा,
कर्मवीर भाउराव पित्यांचा आदर्ष सातारा,
लावणीचा स्वाद सातारा,
शिव शाहिर साबलेंचा
पोवाडा गाणारा सातारा,
चार भिंतीवर मैत्रीचे नाते हळुवार
जपणारा सातारा,
जगात भारी "आम्ही सातारकर" नाद
नाही करायचा सातारकरांचा.

♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪

Map of फेसबुक|सातारा