कोंकण कट्टा

Konkan, Ratnagiri,
कोंकण कट्टा कोंकण कट्टा is one of the popular Local & Travel Website located in Konkan ,Ratnagiri listed under Public places in Ratnagiri , Travel & Transportation in Ratnagiri ,

Contact Details & Working Hours

More about कोंकण कट्टा

माझं कोकण प्रेमाचं...जिव्हाळ्याचं...आपुलकीचं...

बघायला गेलं तर कोकणाचा इतिहास फार पूर्वीचा! स्कंद पुराणात परशुरामाने समुद्रात तीर मारून समुद्रदेवतेस जिथे तो तीर रुतला त्या ठिकाणापर्यंत पाठी जाण्याची आज्ञा केलेली असा उल्लेख आहे. ज्यास कालांतराने सप्त कोकण असे नाव पडले. कोकण म्हणजेच कोण(corner) आणि कण (piece). पुढे वराहमिहीर, रत्नकोष इत्यादी लेखकांच्या लेखनातही कोकण शब्दाचा उल्लेख आढळतो.


कोकणास जवळपास 720 किलोमीटर ची किनारपट्टी लाभलेली आहे, जी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक यात विभागली गेलेली आहे. महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे कोकणात येतात. सम्पूर्णतः सह्याद्री रांगांमध्ये कोकण पसरलेले असून भौगोलिकदृष्ट्या इतका बहरलेला प्रदेश संपूर्ण देशात सापडणे तसे कठीण!

फक्त महाराष्ट्रातच जुहू, व्हर्सोवा, वसई पासून पार अलिबाग, दिवेआगार, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, गणपतीपुळे, गुहागर, जयगड, कुणकेश्वर, तारकर्ली, भोगवे, निवती इत्यादी पर्यंत असंख्य निसर्गाने बहरलेले किनारे आहेत. दिवे, हरिहरेश्वर, कुणकेश्वर, व्याडेश्वर, मार्लेश्वर, आंगणेवाडी, देवबाग ठिकाणांची मंदिरे प्रसिद्ध आहेत.


इतकेच नाही तर आंबोली, चिचघर, गारंबी, नापाणे, सावडाव, सवतकडा इत्यादी ठिकाणचे पावसाळ्यात ओथंबून वाहणारे धबधबे, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जंजिरा, पदमदुर्ग, देवगड सारखे भक्कम किल्ले, निसर्गाने नटलेले आणि प्रवासात उत्साह आणणारे परशुराम घाट, आंबा घाट, ताम्हाणी घाट, तसेच भात, आंबा, काजू, सुपारी, नारळ, पोफळी इत्यादींनी नटलेली हिरवळ, भारतातील सर्वात उंच रेेलवे पूल आणि दुसरा सर्वात लांब रेल्वे बोगदा ह्यांची सैर घडवणारी कोकण रेल्वे इत्यादी सर्व पाहिले की मन तृप्त झाल्याशिवाय राहत नाही आणि इथून निघायची इच्छा होत नाही हे मात्र नक्की.


आपलं कोंकण कट्टा हे page कोकणाच्या निसर्गातले अलौकीक सौन्दर्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवायच काम काही वर्षांपासून करत आहे. तुम्ही टिपलेले कोकणाचे सौन्दर्य, कोकणाशी संबंधित इतर माहिती, कोकणातले इतर लोकोपयोगी उपक्रम, इत्यादी गोष्टी सर्वांपर्यंत पोहचावी ह्यासाठी आमची टीम नेहमीच प्रयत्नशील असते.

आपला असाच सहवास आम्हाला मिळत राहील ह्यात शंका नाही. आणि हो! "येवा कोकण आपलंच असा!"


-कोकण कट्टा टीम
(वर नमूद केलेली काही माहिती ही wikipedia आणि konkantour.in च्या संदर्भा ने घेेण्यात आलेली आहे.)


फोटो पोस्ट करताना...

सर्वांना विनंती आहे फोटो पोस्ट करताना त्या ठिकाणाचे नाव आणि तारीख किंवा साल व महिना नमूद करावा.

Map of कोंकण कट्टा