श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान , तुळजापूर

Bhavani Road,, Tuljapur, 413601
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान , तुळजापूर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान , तुळजापूर is one of the popular Hindu Temple located in Bhavani Road, ,Tuljapur listed under Hindu Temple in Tuljapur , Church/religious organization in Tuljapur ,

Contact Details & Working Hours

More about श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान , तुळजापूर

कृतयुगात कर्दभ नावाचे तपोनिष्ठ ऋषी होऊन गेले. त्यांची पत्नी अनूभुती रुपसंपन्न असून पतिव्रता होती. सुदैवाने तिला पुत्ररत्न प्राप्त झाले.परंतु त्यांचा सुखी संसार फार काळ टिकला नाही. कारण कर्दभ ऋषींनी लवकरच इह्लोकीची यात्रा संपविल्यामुळे अनुभुतिने सति जाण्याचा निर्णय घेतला; परंतु अल्पवयीन पुत्राला मागे सोडून पतिसोबत सहगमन करू नये असे ऋषींनी शास्त्राचा आधार घेऊन सांगितले असता अनुभूतीने आपल्या पुत्राला गुरुगृही सोडुन ती मेरू पर्वतानजिक असलेल्या मंदाकिनी नदीच्या परिसरात गेली. आणी तिथे आश्रम बांधून तिने तपश्चर्या सुरू केली. तिची तपश्चर्या सुरू असताना कुकर नावाचा दैत्य तिच्या अप्रतिम सौंदर्यावर लूब्ध झाला.त्याच्या मनात पापवासना निर्माण होऊन त्याने तिला स्पर्श केला त्यामुळे तिची समाधी भंग पावली. दैत्याने काही अनुचित प्रकार करु नये म्हणून तिने आदिशक्तिचा धावा केला.

यासाठी की शक्तीने या दैत्याच्या तावडीतून आपली सुट्का करावी आणी खरोखरच देवी भवानी मातेच्या रुपाने त्वरित धावून आली. तिने दैत्याशी युदध केले. दैत्यही महिषाचे रूप घेऊन आला. तेव्हा देविने त्रिशुळाने त्याचे शीर वेगळे केले.ही भवानी देवी वेळीच अनुभूतीच्या रक्षणासाठी त्वरित धावून आल्यामुळे तिला त्वरिता असे नाव पडले. कालांतराने त्वरिताचे-तुरजा व त्याचे पुढे तुळजा झाले.निजामशाही असो किंवा आदीलशाही असो कोणीही धार्मिक बाब्तीत हस्तक्षेप करीत नसत.1920 पर्यंत या गावात एकही धर्मशाळा नव्हती.या साली गावची लोकसंख्या सूमारे 5000 एव्हडी होती.

Map of श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान , तुळजापूर

OTHER PLACES NEAR श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान , तुळजापूर